Homeताज्या बातम्यातुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! रुजू होताच पहिली मोठी कारवाई; नेमकं...

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! रुजू होताच पहिली मोठी कारवाई; नेमकं काय सापडलं छाप्यात?

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; पतंजलीशी संबंधित औषधांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच विभागाच्या हालचालींना वेग आला आहे. नागपूर जिल्ह्यातील येरला येथील एका पॅकिंग युनिटवर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली आणि या कारवाईनंतर औषध क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

छाप्यामध्ये नेमकं काय सापडलं, याबाबत सुरुवातीला गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. पतंजली समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीने तयार केलेल्या औषधांचा मोठा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचे समोर आले आहे. या साठ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित कागदपत्रे आणि उत्पादन प्रक्रियेचीही कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंढे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली मोठी कारवाई मानली जात असल्याने प्रशासकीय वर्तुळातही तिची जोरदार चर्चा सुरू आहे. या छाप्यामागे नेमकं कारण काय? जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये कोणत्या प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे? आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन आता राज्यभरातील संशयित युनिट्सवरही लक्ष ठेवून असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!