दावरवाडी ता ९ (अभिजित सोनवणे )
पैठण तालुक्यातील
नांदर येथील स्व.नामदेवराव पा.पिवळ माध्यमिक विद्यालयाचा दहावी निकाल ८३.%०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः
प्रथम क्रमांक- शुभांगी थोरात हिने 80.60.% टक्केवारी घेऊन विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक- अमृता फाळके हिने 79.00% तृतीय क्रमांक – सुहाना तांबोळी हिने 78.20% चतृर्थ क्रमांक -75% शिवकन्या शेळके पाचवा क्रमांक – भक्ति मगरे 74.60% सहावा क्रमांक – सदफ नय्युम शेख 74.60% या सर्वांनी इयत्ता दहावी परीक्षेत यश मिळवले आहे.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव श्री शुभम भैय्या पिवळ. मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे ,यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गूलालकर, सौ. सुरेखा राऊत ,मॅडम आणि प्रा. दीपक पिवळ ,यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.
विद्यालयातील कर्मचारी योगेश धुपे, मदन ठेणगे, गोरक्षनाथ सोनवणे, सतीश कदम आदींनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी कायम राहील, असा विश्वास शिक्षकवर्गाने व्यक्त केला.




















