Homeताज्या बातम्यानाशिकमध्ये ‘म्हाडा’ची ४०२ घरांची सोडत;  ऑनलाइन अर्जांना जयस्वाल यांच्याकडून प्रारंभ...

नाशिकमध्ये ‘म्हाडा’ची ४०२ घरांची सोडत;  ऑनलाइन अर्जांना जयस्वाल यांच्याकडून प्रारंभ…

 परवडणाऱ्या घरांच्या वाटचालीला चालना; २३ डिसेंबरपर्यंत अर्ज नोंदणी

मुंबई, दि.१ : मंगेश म्हात्रे

नाशिककरांसाठी परवडणाऱ्या घरांचा मार्ग आणखी प्रशस्त करत म्हाडा नाशिक मंडळातर्फे आगाऊ अंशदान तत्वावर ४०२ सदनिकांच्या सोडतीची ऑनलाईन प्रक्रिया आज सुरू झाली. ‘गो लाईव्ह’ कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अर्ज नोंदणी व स्वीकृतीचा शुभारंभ करण्यात आला. वांद्रे–पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले, “नाशिक मंडळाने २०२५ मध्ये आतापर्यंत तीन सोडतींद्वारे ८४६ घरे उपलब्ध करून दिली आहेत. ही चौथी सोडत असून परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्याचा मंडळाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.”

नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर या शिवारातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये या ४०२ सदनिकांचा समावेश आहे.

अल्प उत्पन्न गटासाठी (EWS):

चुंचाळे – १३८,पाथर्डी – ३०,

मखमलाबाद – ४८,आडगाव – ७७,एकूण : २९३ सदनिका

मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG):

सातपूर – ४०,पाथर्डी – ३५,

आडगाव – ३४ एकूण : १०९ सदनिका.

घरांच्या किंमती ₹१४,९४,०२३ ते ₹३६,७५,०२३ दरम्यान आहेत. सोडतीत यशस्वी होणाऱ्या अर्जदारांनी घराची रक्कम ५ टप्प्यांत भरायची आहे.

अर्ज कसा करावा? इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज नोंदणीची अंतिम तारीख : २३ डिसेंबर २०२५, रात्री ११.५९

ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची तीच अंतिम मुदत

२४ डिसेंबर : बँकेच्या वेळेत RTGS/NEFT द्वारे रक्कम स्वीकारली जाणार

३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता प्राथमिक यादी जाहीर केली जाईल.

३० डिसेंबर सायं. ६ ते २ जानेवारी २०२६ सायं. ६ या काळात ऑनलाइन आक्षेप–दावे दाखल करता येतील.

६ जानेवारी २०२६ सायं. ६ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

सोडतीचा दिवस, वेळ व स्थळ स्वतंत्रपणे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

उत्पन्न पुरावा अनिवार्य

अर्जदारांना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदारांकडील उत्पन्न प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र ग्राह्य राहील.

सोडतीच्या सर्व अटी–शर्ती, पात्रता, आरक्षण व अर्ज प्रक्रिया माहिती पुस्तिका स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!