Homeताज्या बातम्याफ्लेक्सबंदीच्या आदेशांचे उल्लंघन; कोपरगावात संजय काळे यांचे बैठा सत्याग्रह

फ्लेक्सबंदीच्या आदेशांचे उल्लंघन; कोपरगावात संजय काळे यांचे बैठा सत्याग्रह

कोपरगाव : दिलीप गायकवाड

राजकीय व वाढदिवसांच्या फ्लेक्सवर मुंबई उच्च न्यायालय यांनी घातलेल्या बंदीचा सर्रास भंग होत असल्याचा आरोप करत आज कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी बैठा सत्याग्रह छेडण्यात आहे. शहरात बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट वाढला असून, नियमांचे पालन न केल्यामुळे प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

कोपरगाव शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते तसेच रस्ता दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जात असून, यासाठी कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी नगरपालिका जाहिरात करही बुडवला जात आहे. शासकीय इमारती, संरक्षक भिंती व सार्वजनिक वास्तूंवर बेकायदेशीर शुभेच्छा फलक झळकत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची काळे यांची तक्रार आहे.

वाहनचालक व पादचाऱ्यांचे लक्ष विचलित होईल अशा ठिकाणी फलक लावले जात असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. शाळा, महाविद्यालये व रुग्णालयांच्या १०० मीटर परिसरातही फ्लेक्स लावले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच वीज खांबांना फ्लेक्स बांधल्यामुळे जीवितास धोका निर्माण होत असल्याची बाबही आंदोलनकर्ते काळे यांनी मांडली.

यासोबतच, फ्लेक्सवर ठिकाण, मुदत व पावती क्रमांक नमूद करणे बंधनकारक असतानाही त्याचे पालन होत नसल्याचा आरोप आहे. जनहित याचिका क्र.१५५/२०१६ अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मासिक अहवाल सादर करण्याची अट असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले.

“वारंवार तक्रारी व आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. ना पंचनामा, ना गुन्हे दाखल,” असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. फ्लेक्सच्या वादातून शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या घटनाही घडल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने नाराजी व्यक्त केली. “न्यायालयाच्या आदेशांचा अवमान थांबवा, नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा,” अशी मागणी करत सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!