Homeताज्या बातम्यामाटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

‘लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : अजय मगरे

आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘’लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मावेली पब्लिकेशन्स तर्फे मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ट्रान्सफॉर्मिंग लाइफ इंटू अ साँग : अन इव्हनिंग ऑफ आंबेडकराइट विमेन्स पोएट्री’ या शीर्षकाखाली होणारा हा कार्यक्रम गुरुवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडणार असून, प्रवेश विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.

या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातील आंबेडकरवादी कवयित्रींच्या तीन पिढ्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. मराठीतून इंग्रजीत भाषांतरित करण्यात आलेल्या या कवितांमधून दलित स्त्रीवादी विचारसरणीचा प्रवास, समकालीन ‘क्विअर’ अभिव्यक्ती आणि सामाजिक-राजकीय भान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता होणार असून, मावेली पब्लिकेशन्सच्या सह-संस्थापकांचे प्रास्ताविक, विशेष अतिथी उर्मिला पवार यांचे मार्गदर्शनपर भाषण, तसेच कवयित्री व अनुवादकांच्या सहभागातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात छाया कोरेगावकर, शारदा नवले, डॉ. प्रज्ञा पवार आणि श्रीजा राव यांचा सहभाग असणार आहे.

तसेच कार्यक्रमादरम्यान कवयित्रींकडून कवितावाचन, संपादकांचे व्हिडिओ संदेश आणि भाषांतर प्रक्रियेवरील अनुभव मांडले जाणार आहेत.

या संग्रहाचे संपादन सृजना एन. श्रीधर यांनी केले असून, श्रीजा राव आणि सृजना एन. श्रीधर यांनी अनुवाद केले आहेत. प्रस्तावना उर्मिला पवार यांनी लिहिली आहे. या काव्यसंग्रहात हिरा बनसोडे, उषाकिरण आत्राम, शीतल साठे आणि दिशा पिंकी शेख यांसारख्या कवयित्रींच्या साहित्याचा समावेश आहे.

हा संग्रह दलित स्त्रीत्वाचे अनुभव, ब्राह्मणी पितृसत्तेविरोधातील प्रतिकार, स्वातंत्र्याची जाणीव आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा अधोरेखित करतो.

या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!