कोपरगांव,दि. ६ : चंद्रकांत जोर्वेकर
कोपरगांव तालुक्यातील गोदावरी नदीत होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपरिषद सज्ज झाली आहे.

गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ठराविक मार्ग निश्चित करण्यात आले असून, गर्दीचा अंदाज घेत अनेक मुख्य रस्ते व गल्लीबोळ बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरात विशेष तटबंदी उभारून नियंत्रण ठेवले जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष ठेवण्यासाठी माळे उभारले असून, नगरपरिषद अधिकारीही वाहतूक व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी बर्यापैकी असल्याने विसर्जनावेळी भक्त व गणेश मंडळांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
https://www.facebook.com/share/v/1ALpif9uMK/
या सर्व तयारीमुळे गणेश विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




















