दावरवाडी ता १४ (अभिजित सोनवणे)
पैठण तालुक्यातील नांदर ता. पैठण येथे दि १४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता बौद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रविंद्र काळे, संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान काळे, माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, पं.स.सदस्य ऊदयसेन काळे, ग्रा.पं.सदस्य प्रविण काळे, यशवंत काळे, संदीप काळे, शिवाजी मगरे, संदीप काळे, ईश्वर कांबळे, सपोनि भरत काळे, बबन तुपे, अलिम आत्तार, दिगंबर सोनवणे, संतोष भोसले, व उत्सव कमिटीचे अशोक मगरे, माऊली मगरे, प्रमोद मगरे, प्रितम मगरे, प्रशांत मगरे, विश्वास मगरे, आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.




















