Homeताज्या बातम्यामुंबई व ठाण्यातील डिजिटल मीडिया परिषदेचा भव्य नियुक्ती सोहळा संपन्न

मुंबई व ठाण्यातील डिजिटल मीडिया परिषदेचा भव्य नियुक्ती सोहळा संपन्न

तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला नवी दिशा

मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी )

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या ठाणे व मुंबई विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. हा भव्य नियुक्ती सोहळा मुंबई सीएसटी येथे पार पडला.

या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे पत्रकार व संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी सदैव उभी राहताना पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रातील डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, तसेच डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने,

डिजिटल पत्रकारांचे न्याय हक्क व संरक्षण हे विषय लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त श्री एस एम देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई अध्यक्ष राजा आदाटे, विभागीय सचिव दीपक कैतके, विभागीय सहसचिव दीपक पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग मस्के, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होणे तसेच पत्रकारिता कशाप्रकारे केली पाहिजे याचे मार्गदर्शन व संघटनेबाबत राजा आदाटे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये केले. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मुंबई डिजिटल पत्रकार परिषदेवर मनोज भोयर (अध्यक्ष), गणेश के. जगताप (कार्याध्यक्ष), विनोद कांबळे (उपाध्यक्ष), केतन खेडकर (सचिव), सतशील मेश्राम (कोषाध्यक्ष), उदय कासारे (सहसचिव), महादेव दौंड (सदस्य), बॉबी शेख (सदस्य) अशा नियुक्ती करण्यात आल्या. तसेच ठाणे जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेव चंद्रभूषण विश्वकर्मा (अध्यक्ष), संतोष खरात (कार्याध्यक्ष), इरफान कुरेशी (उपाध्यक्ष), सुनीलकुमार विश्वकर्मा (खजिनदार), अजय मगरे (सचिव), जया विश्वकर्मा (सदस्य), भगवानदास विश्वकर्मा (सदस्य) व नेहा गायकवाड मौर्य यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पत्रकारांची मातृसंस्था संबोधली जाणाऱ्या व 87 वर्षाची परंपरा असलेली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीची ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुंबई कार्यकारणी मध्ये राजकुमार आदाटे (अध्यक्ष), दीपक कैतके (विभागीय सचिव), दीपक पवार (जनरल सेक्रेटरी), विनायक सानप (उपाध्यक्ष), विशाल परदेशी (विभागीय उपाध्यक्ष), परेश समजिस्कर, सुरेश ढेरे, रवींद्र भोजने, सुरेश गायकवाड, पांडुरंग मस्के, शिरीष वानखेडे, उमेश शेट्ये यांची सदस्य म्हणून नियुक्ती करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्ती सोहळ्या दरम्यान नवीन उपस्थित पत्रकारांचा संघटनेत सहभागी होण्याचा उत्साह दिसून आला. दीपक पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच पांडुरंग मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!