कार्यालय :
दिनांक : _०३_ / ०३ / २०२६
जाहीर निवेदन
याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, दीपक साटोटे कोपरगाव , हा बहुजन शक्ती ऑनलाइन २४ न्यूज पोर्टलचा स्ट्रिंगर (वार्ताहर) म्हणून कार्यरत होता. मात्र त्याची नियुक्ती मुदत १ मार्च २०२६ अखेर संपुष्टात आली आहे.
त्यामुळे सदर दिनांकापासून दीपक साटोटे याचा बहुजन शक्ती ऑनलाइन न्यूज २४ पोर्टलशी कोणताही संबंध राहिलेला नाही. तो आमच्या संस्थेचा प्रतिनिधी, वार्ताहर किंवा अधिकृत सदस्य नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच त्याने श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केलेल्या पोस्ट, वक्तव्ये किंवा लेखनाशी बहुजन शक्ती ऑनलाइन न्यूज २४ पोर्टलचा कोणताही संबंध नाही. त्या सर्व बाबींसाठी तो स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार राहील.
याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
(दिलीप गायकवाड)
कार्यकारी संपादक – कोपरगाव
बहुजन शक्ती ऑनलाइन न्यूज २४ पोर्टल




















