Homeताज्या बातम्याभोर-नसरापूर प्रकरणातील नराधमाला फासावर चढवणार..

भोर-नसरापूर प्रकरणातील नराधमाला फासावर चढवणार..

भक्कम पुरावे गोळा करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश…

मुंबई : अजय मगरे

भोर-नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर चढवण्यासाठी पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करावेत, असे कठोर निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आरोपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अमानुष घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला असून भोर आणि नसरापूर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तपासाचा आढावा घेतला. आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती समोर आली असून अशा नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

आरोपीवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी तपास यंत्रणांनी सक्षम पुरावे सादर करावेत, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले. तसेच पीडित चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!