Homeताज्या बातम्यामहाड चवदार तळे सत्याग्रहावरील ऐतिहासिक दस्तावेजाचे पुस्तक प्रकाशित..

महाड चवदार तळे सत्याग्रहावरील ऐतिहासिक दस्तावेजाचे पुस्तक प्रकाशित..

शिवाजी मंदिर नाट्यगृहात सोहळा; अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : अजय मगरे

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त “सत्याग्रह महाड चवदार तळ्याचा” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या पुस्तकाचे लेखक सत्याग्रहाचे प्रमुख संघटक कॉ. आर. बी. मोरे असून, हा दस्तावेज चळवळीचा खरा इतिहास जनतेसमोर मांडणारा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित प्रकाशन समारंभात दलित पँथरचे संस्थापक व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “या पुस्तकामुळे महाड सत्याग्रहाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल.”

या वेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनीही पुस्तकाचे कौतुक करताना नमूद केले की, “स्वतः सत्याग्रहातील महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कॉ. आर. बी. मोरे यांनी हे पुस्तक लिहिल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. हे पुस्तक तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक डॉ. छाया दातार यांनीही या पुस्तकाचे वाचन प्रत्येकाने करावे, असे आवाहन केले. तसेच बोधी रंगभूमी चळवळीचे कार्यकर्ते व माजी नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाटककार संदेश गायकवाड आणि प्रतिशब्द प्रकाशनाचे प्रमुख सुबोध मोरे यांचीही मंचावर उपस्थिती होती.

महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात मार्च महिन्यात झाली असून, त्यानिमित्ताने मुंबईतील “प्रतिशब्द” प्रकाशनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, कार्यक्रमात संघर्षमय सावित्री या संदेश गायकवाड लिखित-दिग्दर्शित व संध्या पानसकर अभिनित नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रयोगाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे ) व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक ...

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी) महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद...

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! अखेर तिसऱ्या दिवशी आरुषचा मृतदेह आढळला; शामचा शोध सुरूच!

नांदरच्या चिमुकल्या भावंडांच्या शोधमोहीमेला मोठे यश; पेटी पुलाजवळ कालव्यात आढळला आठ वर्षीय आरुषचा मृतदेह, संतोष कांबळे व एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले दावरवाडी,१८.(अभिजीत सोनवणे) नांदर : पैठण...

जन्मदाताच बनला दोन चिमुकल्यांचा काळ!

 चॉकलेट-वडापावचे आमिष दाखवून दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा पित्यावर आरोप; पाचोड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, बालकांचा शोध सुरू पैठण,१९.( अभिजीत सोनवणे ) पैठण तालुक्यातील नांदर शिवारात...

दिवाळीनिमित्त ठाण्यात साकारला ‘रायगड रक्षक’ किल्ला; एकता मित्र मंडळाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम!

एक महिना इंटरनेट आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास; तब्बल २५ दिवसांच्या मेहनतीतून किल्ल्याची उभारणी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नागरिकांसमोर ठाणे, दि.१३.( अजय मगरे) कला आणि सांस्कृतिक शहर...

error: Content is protected !!