Homeताज्या बातम्याम्हाडा उपअभियंत्यावर पत्नीचा गंभीर छळाचा आरोप

म्हाडा उपअभियंत्यावर पत्नीचा गंभीर छळाचा आरोप

गर्भवती पत्नीचा छळ केल्याचा आरोप; म्हाडा उपअभियंता वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | प्रतिनिधी

सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्याविरोधातच घरगुती अत्याचाराची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. म्हाडाच्या आर.आर. मंडळातील उपअभियंता अक्षय कोंढाळकर यांच्याविरोधात पत्नी चेतना यांनी शारीरिक व मानसिक छळ, हुंड्याची मागणी आणि अत्याचाराचे गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गर्भवती असताना मारहाणीचा आरोप

तक्रारीनुसार, पत्नी गर्भवती असतानाही पतीने तिचे डोके भिंतीवर आपटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. “हे मूल माझेच आहे का?” असा संशय व्यक्त करत वारंवार मानसिक छळ करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे पत्नीला मोठा मानसिक धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दारूच्या नशेत मारहाण, पैशांसाठी दबाव?

अंधेरी येथील म्हाडा स्टाफ क्वार्टरमध्ये वास्तव्यास असताना पती दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप आहे. मोबाईलची तपासणी करणे, फोन हॅक केल्याची धमकी देणे, आई-वडिलांशी बोलण्यास मनाई करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच घर खरेदीसाठी माहेरहून १० ते १५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. अधिक रकमेची मागणी करत दबाव वाढवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पोलिस तपास सुरू

सदर प्रकरणी संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी पत्नीने केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास बोरिवली पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!