Homeताज्या बातम्याधारावी पुनर्विकासातील हायर -परचेस योजनेला तीव्र विरोध

धारावी पुनर्विकासातील हायर -परचेस योजनेला तीव्र विरोध

पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन बासनात

मुंबई : मंगेश म्हात्रे

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मास्टर प्लॅन बासनात गुंडाळून ठेवत डीआरपी पुनर्विकासाचा गाडा रेटू पाहत आहे. यातच हायर -परचेस योजना धारावीकरांच्या माथी मारून मूळ धारावीकरांना उद्धवस्त करण्याचे धोरण मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने आखले आहे. या योजनेला धारावीकरांचा तीव्र विरोध असून एकही धारावीकर धारावीबाहेर जाणार नाही, असा इशारा उबाठा गटाचे उपशाखा प्रमुख अप्पूराज देवेंद्र यांनी दिला आहे.

राज्य सरकारने धारावीचा विशेष प्रकल्प म्हणून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीच्या पुनर्विकासासाठी मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीची नेमणूक केली आहे. डीआरपी आणि  मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि कंपनी एकत्रितपणे धारावी पुनर्विकास करत आहे. पुनर्विकासाला प्रारंभ करण्यापूर्वी डीआरपीने प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र आजवर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर न करताच धारावीकरांना पात्र अपात्र करण्याचे षडयंत्र कंपनीने सुरू केले आहे. याविरोधात धारावीतील जनता असून जोवर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर होत नाही, तोवर प्रकल्पाची एक वीट रचू देणार नसल्याचा इशारा धारावीकरांनी दिला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पुनर्विकास आधी की टू की पद्धतीने राबविण्याची टिमकी डीआरपीने मिरवली होती. मात्र आता आपल्याच शब्दापासून फारकत घेत रहिवाशांना धारावीबाहेर हकलण्याचा इरादा कंपनीने केला आहे. याला धारावीतील रहिवाशांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. पात्र अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करावे, या मागणीवर धारावीकर ठाम असून त्यासाठी आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही अप्पूराज देवेंद्र यांनी दिला आहे.

त्याचप्रमाणे धारावीत वास्तव्यास असलेल्या वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना धारावीबाहेर घर देण्याची सक्ती डीआरपी करत आहे. याला आमचा विरोध आहे. झोपडीधारकाला हायर -परचेस योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २५ वर्षांसाठी नाममात्र भाडे भरून २६ व्या वर्षी घरचा मालकी हक्क मिळवता येईल, असे डीआरपी बोलत आहे. याला आमचा कडाडून विरोध आहे. सर्व झोपडीधारकांना धारावीत मोफत घरे द्यावीत, अन्यथा आमचा प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे शिवसेना उबाठा गटाचे उपशाखा प्रमुख अप्पूराज देवेंद्र यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी) महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद...

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! अखेर तिसऱ्या दिवशी आरुषचा मृतदेह आढळला; शामचा शोध सुरूच!

नांदरच्या चिमुकल्या भावंडांच्या शोधमोहीमेला मोठे यश; पेटी पुलाजवळ कालव्यात आढळला आठ वर्षीय आरुषचा मृतदेह, संतोष कांबळे व एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले दावरवाडी,१८.(अभिजीत सोनवणे) नांदर : पैठण...

जन्मदाताच बनला दोन चिमुकल्यांचा काळ!

 चॉकलेट-वडापावचे आमिष दाखवून दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा पित्यावर आरोप; पाचोड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, बालकांचा शोध सुरू पैठण,१९.( अभिजीत सोनवणे ) पैठण तालुक्यातील नांदर शिवारात...

दिवाळीनिमित्त ठाण्यात साकारला ‘रायगड रक्षक’ किल्ला; एकता मित्र मंडळाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम!

एक महिना इंटरनेट आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास; तब्बल २५ दिवसांच्या मेहनतीतून किल्ल्याची उभारणी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नागरिकांसमोर ठाणे, दि.१३.( अजय मगरे) कला आणि सांस्कृतिक शहर...

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक कृषी वाहनाची निर्मिती; दावरवाडीच्या इंजिनिअर चंद्रकांत खांडे...

फवारणीपासून कोळपणीपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी इलेक्ट्रिक कृषी वाहनाची निर्मिती; स्मार्ट शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल दावरवाडी, प्रतिनिधी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पैठण तालुक्यातील दावरवाडी...

error: Content is protected !!