पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी-दादेगाव फाट्यावरील झाड कोसळले
दावरवाडी ता ६ (अभिजित सोनवणे )
शनिवारी दि ६ जुन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदर, दावरवाडी, हर्षी,दादेगाव, शिवारात जोरदार वार्यासह पाऊस झाला. यावेळी पैठण- पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी- दादेगाव फाट्यावरील एक मोठे झाड वाऱ्यामुळे उमगळुन रस्त्यावर पडले यावेळी कुठलिही जिवितहानी झाली नाही. तसेच दादेगाव येथील दिपक हजारे यांच्या केळीच्या बागाचेही नुकसान झाले आहे. नांदर येथील एका दुकानावरील पत्रे उडाले असुन , पैठण – पाचोड विद्युत प्रवाह करणार्या तारा देखील तुटुन पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता.




















