Homeताज्या बातम्यारिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात...*

रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न;रिपब्लिकन ऐक्याला नव्या उमेदीने सुरुवात…*

मुंबई , दि.१८.(प्रतिनिधी)

महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या नावाने कार्यरत असलेल्या रिपब्लिकन नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी माता रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर मुंबई येथील शहीद स्मारक हॉल येथे संपन्न झाली.

महाराष्ट्रात / देशात दलित-बौद्ध- आदिवासी- मुस्लिम अल्पसंख्याक ओबीसी – समूह प्रस्थापित पक्षाच्या राजकारणाला कंटाळली आहे, कुठलाही समाज घटक समाधानी नाही,जाती-जातीमध्ये दरी निर्माण होत आहे काही शक्तींकडून जातीय धार्मिक वाद वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे कुठल्याही जिवणमरणाच्या प्रश्नांकडे लक्ष नाही.

महाराष्ट्रात दररोज कुठे ना कुठे बौद्ध आंबेडकरी तरुणांचे हत्याकांड होत आहे महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, गावगुंडांना कुठलाही धाक नाही महाराष्ट्राचे सरकार बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय या राज्यात कोणताही राजकीय पक्ष राजकारणात तग धरू धरू शकणार नाही. या महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी व सर्वच समाजातील उपेक्षित वंचित घटकांना सर्वच क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाशिवाय पर्यायच नाही.

महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांची जनतेची रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी मागणी होती या मागणीची दखल घेऊन सत्ता पक्षाच्या वळचणीला असलेले रिपब्लिकन नेते वगळून बाकी सर्वच रिपब्लिकन पक्ष सामाजिक संघटनेचे एकत्रीकरण करण्यावर बैठकीत एकमत झाले.

*• बैठकीत सर्वानुमते पुढील ठराव घेण्यात आले •*

(१) रिपब्लिकन (आंबेडकरी) ऐक्याची चळवळ “संविधान परिवार” या बॅनरखाली भविष्यकाळात गतिमान करणार.

(२) रिपब्लिकन ऐक्याची जाहीर अभिवादन सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२६ सायं.५ वा.शिवाजी पार्क दादर होणार

(३) दिनांक १६ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चाचे आयोजन

(४) दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ सर्व पक्ष नेत्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक – नाशिकयेथे होणार (निमंत्रक अण्णासाहेब कटारे).

मुंबईतील ऐक्याच्या बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाई तानसेन ननावरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष सागर भाई संसारे
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी बागडे, पॅंथर संघटना अध्यक्ष मनोज गायकवाड, जय भीम आर्मी अध्यक्ष नितीन मोरे, रवींद्र शेंडे नागपूर, समाज भूषण सो.ना.कांबळे, अँड डॉ.डी. एस. सावंत, पोपटराव सोनवणे, अशोक हिरे, दिनेश भडांगे, आनंद जाधव, श्याम वाडकर,सुमित चव्हाण, अशोक शेळके, तानाजी कांबळे, सुमित भालेराव, ईश्वरसिंग झंझोटड, शिवाजी म्हस्के, मनोहर ओगले, भाई संजीव चंद्रा, विनोद रंगारी, देवेंद्र बागडे, बिपीन कटारे, शरद बनसोडे, चांगदेव कसबे, विजय गायकवाड, प्रवीण आवळे, रेहान शेख, राहुल गायकवाड, श्याम बागुल, विकास कारे, दिलीप मंडल, दामू आढांगळे, आदी पक्ष प्रमुख उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नशामुक्ती अभियान व जनजागृती संवादाचे आयोजन; व्यसनमुक्त समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन

ठाणे, दि.१९.( अजय मगरे ) व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक ...

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! अखेर तिसऱ्या दिवशी आरुषचा मृतदेह आढळला; शामचा शोध सुरूच!

नांदरच्या चिमुकल्या भावंडांच्या शोधमोहीमेला मोठे यश; पेटी पुलाजवळ कालव्यात आढळला आठ वर्षीय आरुषचा मृतदेह, संतोष कांबळे व एनडीआरएफ पथकाने बाहेर काढले दावरवाडी,१८.(अभिजीत सोनवणे) नांदर : पैठण...

जन्मदाताच बनला दोन चिमुकल्यांचा काळ!

 चॉकलेट-वडापावचे आमिष दाखवून दोन मुलांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकल्याचा पित्यावर आरोप; पाचोड पोलिसांकडून आरोपी ताब्यात, बालकांचा शोध सुरू पैठण,१९.( अभिजीत सोनवणे ) पैठण तालुक्यातील नांदर शिवारात...

दिवाळीनिमित्त ठाण्यात साकारला ‘रायगड रक्षक’ किल्ला; एकता मित्र मंडळाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा उपक्रम!

एक महिना इंटरनेट आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास; तब्बल २५ दिवसांच्या मेहनतीतून किल्ल्याची उभारणी, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा इतिहास नागरिकांसमोर ठाणे, दि.१३.( अजय मगरे) कला आणि सांस्कृतिक शहर...

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक कृषी वाहनाची निर्मिती; दावरवाडीच्या इंजिनिअर चंद्रकांत खांडे...

फवारणीपासून कोळपणीपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी इलेक्ट्रिक कृषी वाहनाची निर्मिती; स्मार्ट शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल दावरवाडी, प्रतिनिधी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पैठण तालुक्यातील दावरवाडी...

error: Content is protected !!