ठाणे, दि.१९.( अजय मगरे )
व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, कुटुंबव्यवस्था सक्षम व्हावी आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक सुखदेव किसन उबाळे यांच्या पुढाकाराने नशामुक्ती अभियान व जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संवाद कार्यक्रमात व्यसनाधीनतेची कारणे व दुष्परिणाम, युवक आणि कुटुंबावर होणारे परिणाम, नशामुक्तीसाठी उपलब्ध उपचार तसेच व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी समाजाची भूमिका व जबाबदारी या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नशामुक्ती अभियान व जनजागृती संवाद
व्यसनमुक्ती • सशक्त कुटुंब • सुरक्षित समाज
आयोजक : सुखदेव किसन उबाळे (ज्येष्ठ समाजसेवक)
दिनांक : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : अंबिका नगरपालिका क्र. २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.
विशेष आवाहन :
सर्व बंधू-भगिनी, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी, समृद्ध आणि व्यसनमुक्त बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक आयु. सुखदेव किसन उबाळे यांनी केली आहे.
घोषवाक्य : चला, व्यसनाला नकार देऊया; सशक्त कुटुंब आणि सुरक्षित समाज घडवूया!



















