Homeताज्या बातम्यामाहीम मच्छिमार कॉलनीच्या पुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय

माहीम मच्छिमार कॉलनीच्या पुनर्विकासाबाबत लवकरच निर्णय

मुंबई | मंगेश म्हात्रे

माहीम येथील मच्छिमार कॉलनीच्या समूह पुनर्विकासाबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन यासंदर्भातील प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी माहीम परिसरातील मच्छिमार कॉलनीतील इमारत क्रमांक १ ते २०, पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक १ ते २५, तसेच परिसरातील चार स्वायत्त वसाहती आणि म्हाडा कॉलनीचा क्लस्टर पद्धतीने पुनर्विकास करण्याची मागणी केली होती. या भागातील इमारती जीर्ण अवस्थेत असून नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांचा अभाव जाणवत असल्यामुळे स्थानिकांकडून पुनर्विकासाची मागणी सातत्याने होत आहे.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, प्रकल्पास विलंब होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर म्हाडा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बृहन्मुंबई व उपनगरांतील २० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा अभिन्यासांचा समूह पुनर्विकास करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे.

या चर्चेत सदस्य सुनील शिंदे, प्रवीण दरेकर, अनिल परब यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. माहीम मच्छिमार कॉलनीच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून लवकरच ठोस कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!