Homeताज्या बातम्या३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला…

३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला…

बिल्डरच्या हक्कालपट्टीसाठी रहिवाशांचे आमरण उपोषण सुरू

मुंबई, दि.४: मंगेश म्हात्रे

काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.

३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी हाती घेतले आहे. गेल्या ३० वर्षात विकासकाला प्रकल्प पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयश आले असून रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिले आहेत. या मागणीसाठी युवा संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते आणि रहिवासी यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषणास सुरुवात केली, तर महिलांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला आहे.

‘एसआरए’ने मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. विकासकां विरोधात कलम १३(२) अंतर्गत कारवाई केली होती l, उच्चस्तरीय बैठकीत ही प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण झालेले नाही. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार “तीन दशके उलटली, पण अद्याप एकाही पुनर्वसन इमारतीचे काम सुरू झालेले नाही.”

अनेक वर्ष रखडलेल्या काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्पामुळे रहिवाशांमध्ये संतापाचा उद्रेक वाढला असून, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून विकासकांला प्रकल्पातून निष्कासित करावे आणि जिजामाता नगरचा एसआरए प्रकल्प शासन ताब्यात घेऊन पूर्ण करावा, अशी एकमुखी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जात आहे.

“आम्ही आमच्या हक्काच्या घरांसाठी लढत आहोत; शासनाने न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल.” असा इशारा जिजामाता नगर युवा संघर्ष संघटनेचे विलास सोगम, संजय गोसावी, निलेश गुरव, विजय परब, मुकुंद गावडे, संदीप पांढरे, किरण निकम आदींनी निवेदनाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

उपकरप्राप्त इमारतींच्या रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडाची डिजिटल तक्रार प्रणाली सुरू

ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल...

error: Content is protected !!