Homeताज्या बातम्या‘किडनॅपिंग ते लूट’ ६ तासांत, ६ जणांना अटक”! अँटॉप हिल पोलिसांची...

‘किडनॅपिंग ते लूट’ ६ तासांत, ६ जणांना अटक”! अँटॉप हिल पोलिसांची वेगवान कारवाई

मुंबई – मंगेश म्हात्रे

मुंबई पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या थराराने हादरली आहे! अपहरण करून कोट्यवधींची जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६ तासांत पर्दाफाश करत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या थरारक कारवाईत केवळ मोठा गुन्हा उघड झाला नाही, तर मुंबई ते गोवा असा पसरलेला गुन्हेगारी साखळीचा धक्कादायक धागाही समोर आला आहे. पोलिसांच्या वेगवान अॅक्शनमुळे या टोळीमागील आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विरार पश्चिम येथे राहणारे श्रवण लक्ष्मण रावल (वय ४५) हे अँटॉप हिल परिसरातून चालत जात असताना चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण करत जबरदस्तीने वाहनात बसवले. आरोपींनी त्यांना धमकावत त्यांच्या जवळील सुमारे ३२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आणि त्यानंतर घाटकोपर परिसरात सोडून दिले. या घटनेनंतर अँटॉप हिल पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा अतिशय गुंतागुंतीचं असल्याने व गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने कोणतेही धागेदोरे प्राप्त होत नसल्याने. फिर्यादीच्या कंपनीमधून मागील वर्षभरात नोकरी सोडून गेलेल्या ८ लोकांची माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून एका संशयित इसमाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. सदर इसमास गुप्त बातमीदारमार्फत ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने व त्याच्या इतर ७ साथीदारांनी मिळून गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. मुंबई ते गोवा असा गुन्हेगारीचा थेट कनेक्शन समोर आल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल एकनाथ गायकवाड (वय ३०), इरफान अली अहमद अली खान (वय ३३), विवेक विलास काकडे (वय ३२), संतोष वसंत मळेकर (वय ४४), स्वनील चंद्रकांत पाटील (वय ३४) आणि मोहम्मद रिजवान अन्सार (वय ४१) यांचा समावेश आहे. यापैकी दोन आरोपींना नालासोपारा येथून, तीन आरोपींना गोवा राज्यातून तर एकाला कुर्ला नेहरू नगर येथून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण २९ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अँटॉप हिल पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या काही तासांत ही कामगिरी फत्ते करत गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. मात्र, या टोळीचे आणखी धक्कादायक कारनामे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुढील तपास अधिक वेगाने सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!