Homeताज्या बातम्यामुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत जवळपास २ कोटींचा...

मुंबईत होळीचा जल्लोष अन् वाहतूक नियमांचा धसका; दोन दिवसांत जवळपास २ कोटींचा दंड वसूल!

मुंबईत होळी-धुलीवंदनानिमित्त विशेष वाहतूक मोहीम; १६,७२७ चालकांवर कारवाई

मुंबई : होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष वाहतूक मोहिमेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत तब्बल १६,७२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून एकूण १ कोटी ९९ लाख ९१ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेगमर्यादा उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि हायवेवर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली.

सर्वाधिक कारवाई ‘स्पीड लिमिट’ आणि ‘हेल्मेट’ प्रकरणांवर

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वेगमर्यादा उल्लंघनाची सर्वाधिक ४,४८६ प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या ४,३१७ जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या २,५३२ वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई झाली.

याशिवाय सिग्नल तोडणे (६१०), परवाना नसणे (४३१), ट्रिपल सीट (५३०), वन-वे मध्ये प्रवेश (२७८) अशी प्रकरणे समोर आली. चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या २० जणांची प्रकरणे न्यायालयात पाठवण्यात आली.

सीसीटीव्ही व ई-चलन प्रणालीचा वापर

ही मोहीम सीसीटीव्ही कॅमेरे, ई-चलन प्रणाली आणि विशेष तपासणी नाक्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात आली. ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणांमध्ये संबंधित चालकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित असून परवाना निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!