Homeताज्या बातम्यामहाड चवदार तळे सत्याग्रहावरील ऐतिहासिक दस्तावेजाचे पुस्तक प्रकाशित..

महाड चवदार तळे सत्याग्रहावरील ऐतिहासिक दस्तावेजाचे पुस्तक प्रकाशित..

शिवाजी मंदिर नाट्यगृहात सोहळा; अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : अजय मगरे

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त “सत्याग्रह महाड चवदार तळ्याचा” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. या पुस्तकाचे लेखक सत्याग्रहाचे प्रमुख संघटक कॉ. आर. बी. मोरे असून, हा दस्तावेज चळवळीचा खरा इतिहास जनतेसमोर मांडणारा असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित प्रकाशन समारंभात दलित पँथरचे संस्थापक व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “या पुस्तकामुळे महाड सत्याग्रहाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल.”

या वेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनीही पुस्तकाचे कौतुक करताना नमूद केले की, “स्वतः सत्याग्रहातील महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कॉ. आर. बी. मोरे यांनी हे पुस्तक लिहिल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढते. हे पुस्तक तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक डॉ. छाया दातार यांनीही या पुस्तकाचे वाचन प्रत्येकाने करावे, असे आवाहन केले. तसेच बोधी रंगभूमी चळवळीचे कार्यकर्ते व माजी नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाटककार संदेश गायकवाड आणि प्रतिशब्द प्रकाशनाचे प्रमुख सुबोध मोरे यांचीही मंचावर उपस्थिती होती.

महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात मार्च महिन्यात झाली असून, त्यानिमित्ताने मुंबईतील “प्रतिशब्द” प्रकाशनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, कार्यक्रमात संघर्षमय सावित्री या संदेश गायकवाड लिखित-दिग्दर्शित व संध्या पानसकर अभिनित नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रयोगाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!