Homeताज्या बातम्यायोजना कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर आक्रोश;

योजना कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर आक्रोश;

कायम नोकरी, वेतनश्रेणीसह सामाजिक सुरक्षेची मागणी…

मुंबई : प्रतिनिधी

पोषण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या शासकीय योजना राबवणाऱ्या हजारो योजना कर्मचाऱ्यांनी सोमवारी आझाद मैदानावर जोरदार आक्रोश ठिय्या आंदोलन करत आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) संलग्न योजना कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले.

या आंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी तसेच शालेय पोषण आहार कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, वेतनश्रेणी लागू करावी आणि ईएसआयसी, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी व पेन्शनसारख्या सामाजिक सुरक्षा सुविधा द्याव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.

सिटूच्या नेत्यांनी सांगितले की, एकात्मिक बालविकास सेवा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मध्यान्ह भोजन योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजना अनेक दशकांपासून सुरू असूनही शासन त्यांना अद्याप तात्पुरत्या योजना म्हणूनच वागणूक देत आहे. महिला व बालकांपर्यंत पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सेवा पोहोचविणारे कर्मचारी मात्र अल्प मानधनावर काम करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांनी राज्यातील सर्व कामगारांसाठी किमान ३० हजार रुपये मासिक वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, समान कामाला समान वेतन तसेच असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळे कार्यान्वित करण्याची मागणीही केली.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली असून विविध मागण्यांवर चर्चा झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांनीही शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मंगळवारी घरेलू कामगार, बांधकाम कामगार आणि बिडी कामगारांसह असंघटित क्षेत्रातील अन्य कामगारही या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली.

या आंदोलनाला सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम, आशा फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!