ठाणे : अजय मगरे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले. ठाणे येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकहिंद न्यूज चॅनलकडून दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येतो.
या सोहळ्यास झी २४ तासचे माजी मुख्य संपादक, ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ तथा समाजमाध्यम सल्लागार डॉ. उदय निरगुडकर, नगरसेवक राजेश मोरे, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज सांबरे तसेच समाजसेवक किसन बोंद्रे उपस्थित होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्वतः अनिल काकुळते यांनी केले. त्याच कार्यक्रमात त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याने उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.




















