मुंबई, दि.४ : मंगेश म्हात्रे
म्हाडातर्फे आयोजित १३ वा लोकशाही दिन सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी म्हाडा मुख्यालय, वांद्रे (पूर्व) येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल भूषविणार आहेत.
जानेवारी २०२४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नागरिकांच्या तक्रारींवर थेट व खुली चर्चा केली जाते. संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीत प्रकरणांचा आढावा घेऊन तात्काळ निर्णय देण्याची प्रक्रिया राबवली जाते. आतापर्यंत बारा लोकशाही दिनांत शेकडो प्रकरणे निकाली काढली गेली असून नागरिकांना त्वरित व पारदर्शक न्याय मिळत आहे.
लोकशाही दिनापूर्वी मागील बैठकीतील प्रकरणांवरील कारवाईचा आढावा घेण्याची पद्धतही राबवली जाते. त्यामुळे म्हाडा प्रशासन नागरिकाभिमुख, संवेदनशील व उत्तरदायी ठरत असल्याचा विश्वास वाढत आहे.
म्हाडा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात आणि त्यांचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. मात्र न्यायालयीन, सेवाविषयक, राजस्व तसेच अपूर्ण कागदपत्रांसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अशा अर्जांची संबंधित विभागाकडे आठ दिवसांत पाठवणी केली जाणार आहे

















